मुख्यमंत्र्यांनी राजभवनावरून उड्डाण का टाळलं? राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वादामुळे हा निर्णय?
Continues below advertisement
मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच जव्हार दौऱ्यावर येत असून जव्हार मोखाद्यातील आरोग्य यंत्रणेची ते पाहणी करतील . जव्हार मोखाद्या सारख्या आदिवासी बहुल दुर्गम भागात आज ही आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था असून मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यानंतर तरी येथील आरोग्य व्यवस्था सुधारेल अशी अपेक्षा येथील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे . जव्हार मधील जामसर येथील बाल उपचार केंद्र , कॉटेज हॉस्पिटल , खरवंद अंगणवाडी, घरकुलांची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून केली जाणार आहे.
Continues below advertisement