Shivsena Dasara Melawa : ठाकरे आणि शिंदेंच्या मेळाव्यात कुणाचा आवाज अधिक ?
ठाकरे आणि शिंदेंच्या मेळाव्यात कुणाचा आवाज अधिक हे देखील आता समोर आलंय. आवाज फाऊंडेशननं केलेल्या मोजणीत उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात १०१.६ डेसिबल इतका आवाज नोंदवला गेला. तर बीकेसीत ८८ डेसिबल इतका आवाज नोंदवला गेला. नेत्यांनी केलेल्या भाषणात सर्वात अधिक आवाज शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांचा होता. त्यांच्या भाषणाचा आवाज ९७ डेसिबलपर्यंत पोहोचला होता. तर शिंदे समर्थक खासदार धैर्यशील माने यांच्या भाषणाचा आवाज ८८.५ डेसिबल नोंदवला गेला...
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS