Shivsena : खरी शिवसेना कोणाची?, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सामना
खरी शिवसेना कुणाची यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा दुसरा अंक आजपासून केंद्रीय निवडणूक आयोगात रंगणार आहे.. शिवसेना पहिली मागणी स्थगितीचीच करणार असल्याचं समजतंय... सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना आयोगाने निर्णयाची घाई करु नये अशी विनंती शिवसेना करणार आहे.. शिंदे गटाला आयोगाकडे धाव घेण्याचा हक्क नाही अशी ठाकरे गटाची भूमिका आहे.. जे लोक आयोगासमोर आलेत त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे त्यांना आयोगाकडे दावा करण्याचा हक्कच नसल्याचा शिवसेनेचा युक्तीवाद आहे. शिवसेना पक्षाची घटना, गेल्या काही वर्षातल्या पक्षांतर्गत निवडणुकांचा इतिहास, त्या त्या पदांची जबाबदारी याचा गोषवारा निवडणूक आयोगाकडे सादर केला जाणार आहे. भाजपासोबत सरकार बनवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी १९ जुलै २०२२ रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहलंय. त्यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी तसेच धनुष्यबाण चिन्ह मिळावं अशी मागणी शिंदेंनी केलीय. त्यानंतर दोन्ही बाजूंना आपापली बाजू मांडण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने आयोगाच्या कार्यवाहीला थेट स्थगिती दिलेली नाही.. त्यामुळे आयोगाच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय...