Loksabha Election : महाराष्ट्रात कधी , कुठे मतदान? : ABP Majha

देशात सर्वाधिक उत्सुकता असलेल्या लोकसभा निवडणुकांची घोषणा आज करण्यात आलीय. १९ एप्रिलपासून १ जूनपर्यंत देशात लोकसभा निवडणुकांचं मतदान होणार आहे. तर ४ जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज लोकसभा निवडणुकांचं हे वेळापत्रक जाहीर केलं. राज्यात एकूण ५ टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे या पाच टप्प्यात राज्यात मतदान होणार आहे. मुंबई आणि एमएमआरमध्ये २० मे या दिवशी म्हणजेच अखेरच्या टप्प्यात मतदान होईल.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola