Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष? कुणावर साधणार निशाणा
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज मुंबईतील गोरेगावमधल्या नेस्को मैदानावर धडाडणार आहे... निमित्त आहे गट अध्यक्षांच्या मेळाव्याचं... आणि या मेळाव्यात राज ठाकरे कुणाचा समाचार घेणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.. सध्या अनेक विषयांवरुन राजकारण तापलं आहे... राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी शिवाजी महाराजांबात केलेलं वक्तव्य, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, सावरकरांबाबत राहुल गांधींनी केलेलं विधान याशिवाय इतर मुद्द्यांवर राज ठाकरे काय बोलतात याकडे मनसे कार्यकर्त्यांसह सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.