Nawab Malik : नवाब मलिक यांच्या संदर्भातील व्हायरल मेसेजचा अर्थ काय? : ABP Majha

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना दोन महिन्यांसाठी वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळाला खरा, पण त्यानंतर ते शरद पवार गटाचे की अजित पवार गटाचे, अशी चर्चा रंगू लागलीय.  याला निमित्त ठरलंय ते छगन भुजबळांच्या वक्तव्यावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या परशुराम सेनेचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांच्या विरोधात आज राष्ट्रवादी आंदोलन करणार आहे. हे आंदोलन नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या नेतृत्वात करणार असल्याचा मेसेज अजित पवार गटाकडून व्हायरल करण्यात आलाय. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला की नवाब मलिक आपल्या सोबत आहेत, असं दाखवण्याचा अजित पवार गट प्रयत्न करतोय, याबाबत चर्चा रंगू लागलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram