Shiv Sena Whip on Thackeray Group :आयोगाच्या निकालात काय म्हणटलं? ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार का?
Continues below advertisement
बातमी, ठाकरे गटाच्या आमदारांच्या अडचणी वाढणार का? यासंदर्भातली.. या महिन्याच्या शेवटी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणारे, आणि या अधिवेशनात निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना म्हणजेच शिंदे गट सर्वच्या सर्व आमदारांना व्हिप लागू करण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार का?, अशी चर्चा सुरु झालीय, पण ठाकरे गटाच्या आमदारांना व्हिप लागू होणार नाही, असं मत राज्यातील अनेक कायदेतज्ज्ञानी व्यक्त केलंय.. आणि त्याचं कारण म्हणजे निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय, आयोगानं निर्णय देताना ठाकरे आणि शिंदे गट असे दोन गट मान्य केले आहेत... त्यामुळे जरी शिवसेना शिंदेंची झाली, तरीही ठाकरे गटाच्या आमदारांना व्हिप लागू होणार नाही, असं मत कायदेतज्ज्ञांनी केलंय...
Continues below advertisement