Karnataka Election Results : कर्नाटकात काँग्रेसच्या विजयाची कारणं काय?
कर्नाटक विधानसभा जिंकली खरी पण काँग्रेस नेतृत्वाची खरी परीक्षा आता सुरू झालीय. कारण मुख्यमंत्रिपदासाठी चार उमदेवारांच्य़ा नावांची चर्चा झालीय. सिद्धरामय्या, डी.के. शिवकुमार, जी. परमेश्वर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यापैकी कोण मुख्यमंत्री होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दलित आणि मुस्लिम मतदारांमध्ये प्रसिद्ध असलेले सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. तर संकटमोचक अशी ओळख असलेले डीके शिवकुमार यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पाचवेळा आमदार राहिलेले जी परमेश्वर २०१३ नंतर पुन्हा मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये आलेत. तर काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर लगेचच कर्नाटकची विधानसभा जिंकल्याने मल्लिकार्जुन खर्गे पुन्हा प्रकाशझोतात आलेत. त्यांची यापूर्वी तीनवेळा मुख्यमंत्रिपदाची संधी हुकलीय... .या सर्वांचा विचार केल्यास मुख्यमंत्री कुणाला करायचे, ही काँग्रेससाठी सत्वपरीक्षा ठरणार आहे