महाराष्ट्रात आम्ही असेपर्यंत राजकीय प्रादुर्भाव होणार नाही,आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरतोय -संजय राऊत

Continues below advertisement

मुंबई : महाराष्ट्रात आम्ही असेपर्यंत राजकीय प्रादुर्भाव होणार नाही, आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरत आहोत. शिवसेना खासदारांच्या बैठकीनंतर नेते संजय राऊत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. आज शिवसेनेच्या सर्व खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा या निवासस्थानी बैठक पार पडली. सर्व खासदारांच्या मतदारसंघातील कोरोना प्रदूर्भावाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बैठक बोलावली असल्याचं नेते संजय राऊत यांनी बैठकीनंतर स्पष्ट केलं. तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील बैठकीशी आजच्या या बैठकीचा संबंध नसल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram