Sanjay Raut PC | महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन होईल : संजय राऊत | नवी दिल्ली | ABP Majha
राज्यात शिवसेनेच्याच नेतृत्वात सरकार येईल असा पुनरुच्चार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी महाराष्ट्रात स्थिर येईल असा विश्वास व्यक्त केलाय. शरद पवारांनी काल दिल्लीत टाकलेल्या गुगलीवर विचारलं असता पवार समजून घ्यायला शंभर जन्म घ्यावे लागतील असं राऊत म्हणालेत. सत्तास्थापनेबाबत शिवसेनेच्या मनात कोणताही गोंधळ नसून फक्त माध्यमांच्या मनात हा गोंधळ असल्याचेही त्यांनी सांगितलं. भाजपने शिवसेनेच्या रुपाने चांगला मित्रपक्ष गमावल्याचा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला.