आमदार रणजित कांबळेंची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत दमदाटी, वर्ध्यामधील देवळीतील प्रकार

वर्धा : वर्ध्यातील देवळीचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय डवले यांना शिवीगाळ करत दमदाटी केली असल्याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. देवळी मतदारसंघात आयोजित तपासणी शिबीरावरून ही दमदाटी झाल्याची माहिती पुढे येत आहे. या ऑडीओ क्लिपमध्ये आमदार कांबळे यांनी अत्यंत अर्वाच्च भाषेत शिविगाळ केल्याचं समोर आलं आहे. तसेच मारहाण करण्याची देखील धमकी दिल्याचं या क्लिपमधून समोर येत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola