Vinod Tawde Vs Jitendra Awhad : शिवरायांबद्दलचं विधान, जितेंद्र आव्हाड विनोद तावडेंमध्ये जुंपली

Continues below advertisement

Vinod Tawde Vs Jitendra Awhad : शिवरायांबद्दलचं विधान, जितेंद्र आव्हाड विनोद तावडेंमध्ये जुंपली

 प्रामाणिक पणे कबुल केलेत की आपण मोघलांचा इतिहास काढणार होतात. आता त्यानंतर जे आज सर्वसारव करत आहात त्याचतला एक शब्द ही आपण बोलला नव्हता .. छत्रपतींच्या शौर्याचा इतिहास आपण काढणार असे मी म्हंटले नाही. पण मग महराजांचा संघर्ष कुणा बरोबर झाला एवढाच प्रश्न ? - जितेंद्र आव्हाड


मी शिक्षण मंत्री असताना मुघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून काढणार, असं जितेंद्र आव्हाड एका भाषणात म्हणाले. मी सांगू इच्छितो की, मोगलांचा इतिहास काढणार याचा अर्थ छत्रपतींचा शौर्याचा इतिहास काढणार असे होत नाही. मोगलांचा इतिहास काढणार याचा अर्थ, आदीलशाही, कुतुबशाही, निजामशाही यांची भलामन करणारा इतिहास बाजूला काढणार. मोगलांनी कलेला आश्रय दिला, त्यांचे स्थापत्यशास्त्र चांगलं होतं, हा इतिहास काढणार. अकबर द ग्रेट ज्याने लाखो हिंदूची कत्तल केली, याची शिकवण बाजूला काढणार.मला जितेंद्र आव्हाड यांचे लॉजिक समजत नाही. शाहिस्ते खान, औरंगजेब शिकवला म्हणजे महाराजांचे शौर्य कळते का? त्यांना असं म्हणायचं आहे का, कसाब आला म्हणून शहीद तुकारम ओंबळे, करकरे यांचे शौर्य दिसले. ते शूर होतेच, त्यासाठी कसाबने येण्याची गरज नव्हती. - विनोद तावडे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram