Vinayak Raut On Narayan Rane : जुने व्हिडिओ दाखवत विनायक राऊत यांची नारायण राणेंवर टीका
Vinayak Raut : नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारसह शिवसेनेवर जोरदार टीका केली. त्यावर प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीसांचे विधानसभेतील जुने व्हिडिओ दाखवत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी नारायण राणेंवर (narayan rane) प्रहार केला आहे. यासोबतच नारायण राणेंनी सत्तेसाठी लाचारी पत्करली असा आरोप करत विनायक राऊतांनी राणेंवर निशाणा साधलाय.