Kolhapur Gram Panchayat Election : शाहूवाडीत नगरपंचायतसाठी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
abp majha web team
Updated at:
18 Dec 2022 03:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 430 ग्रामपंयतींसाठी मतदान सुरु असतानाच शाहूवाडी तालुक्यात मात्र, पूर्णत: सन्नाटा आहे. ग्रामस्थांनी शाहूवाडीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे शाहूवाडीतील मतदान केंद्रे मतदारांअभावी ओस पडली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शाहूवाडी ग्रामस्थांचा विविध माध्यमातून शाहूवाडी नगरपंचायत करावी या मागणीसाठी लक्ष वेधले आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानतंर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्ह्यात एकीकडे चुरशीना मतदान होत असताना शाहूवाडी मात्र शुकशुकाट आहे.