Vidhansabha Ajit Pawar : कांदा प्रश्नावरुन विरोधकांची सभागृहात घोषणबाजी : ABP Majha

Continues below advertisement

आज विधानसभेत विरोधकांचा शेतकऱ्यांसाठी मोठा आवाज घुमला... शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी विरोधक आक्रमक झाले होते... पण सरकारकडून कुठलंही ठोस आश्वासन न मिळाल्याने सरकारचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला... कांदा, कापूस, भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय... त्यातच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय... हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी रडकुंडीस आलाय... या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, ही विरोधकांची मागणी आहे... त्यासाठी विरोधकांनी सभागृहात जाण्यापूर्वी पायऱ्यांवर बॅनर झळकावून घोषणाबाजी केली होती... दरम्यान, पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं...  पण ठोस कुठलीही मदत जाहीर केली नाही... त्यावरून आक्रमक विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram