Vidarbha Voting : विदर्भात किती टक्के मतदान झालं, पाहा व्हिडिओ... ABP Majha
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान आज झालं. देशात १०२ मतदारसंघात पहिल्या टप्प्याचं मतदान आज झालंय. यात राज्यातल्या पश्चिम विदर्भातल्या पाच मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी पाच वाजेपर्यंत राज्यात ५४.८५ टक्के मतदान झालंय.
पहिल्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७.००वा.पासून सुरू झालं. सर्वाधिक मतदान गडचिरोली चिमूर मतदारसंघात ५५.७९ टक्के एवढं झालंय. देशात सर्वच भागात जोरदार उन्हाळा सुरू आहे. त्याचाही परिणाम मतदानावर झाल्याचं दिसून येतंय. मात्र काही भागात मतदानकेंद्रांबाहेर रांगा लावून मतदान सुरू असलल्याचं दिसून आलं.
Continues below advertisement