Uttar Pradesh Election 2022: गोरखपूरमध्ये योगी विरुद्ध रावण, 403 जागांवर निवडणूक ABP Majha

Continues below advertisement

अखिलेश यादव यांच्या सपाबरोबर युतीची चर्चा फिसकटल्यानंतर भीम आर्मीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. उत्तर प्रदेशमधील सर्व ४०३ जागांवर भीम आर्मी उमेदवार देणार आहे. भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ज्या गोरखपुरमधून निवडणूक लढवणार आहेत तेथूनच निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेेतलाय. आज चंद्रशेखर आझाद यांनी याबाबत घोषणा केलीय. चंद्रशेखर प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. योगींना रोखण्यासाठी मला लढणे आवश्यक आहे आणि आता थेट योगींबरोबर लढाई होईल असे चंद्रशेखर आझाद यांनी म्हटले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram