Pratik Patil : राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतिक पाटील यांची बिनविरोध निवड
Continues below advertisement
सांगलीच्या इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतिक पाटील यांची बिनविरोध निवड झालीय. महत्त्वाचं म्हणजे, जयंत पाटील यांनीही १९८४ साली याच कारखान्याच्या संचालकपदापासून राजकीय जीवनाची सुरूवात केली होती. आता प्रतिक पाटीलही हे पहिल्यांदाच साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले असून, आता त्यांच्या प्रत्यक्ष राजकीय कारकीर्दीला सुरूवात होईल, असं बोललं जातंय.
Continues below advertisement