Uddhav Thackeray | आज दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदभार स्वीकारणार | ABP Majha

तब्बल दोन दशकांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसला आहे. त्यात काल ठाकरे घराण्य़ातील पहिला सदस्य तेही थेट उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत विराजमान होणार आहेत.आज दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन आपला पदभार स्वीकारणार आहेत..  काल महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  शिवतीर्थावर शपथ घेतली. शपथ घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जात अभिवादन केलं. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. उद्धव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आणि शिवतीर्थावर उपस्थित तमाम जनतेलाही वंदन केलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola