Nawab Malik | मुख्यमंत्रीपदाचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार : नवाब मलिक | ABP Majha
मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय. शिवाय, मुख्यमंत्रिपदाचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याचंही मलिक यांनी सांगितलं आहे. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या राष्ट्रवादीच्या दाव्यावरही आजच्या बैठकीत चर्चा होऊन त्यात निर्णय घेतला जाईल, असंही मलिकांनी म्हटलंय.