Shinde Vs Thackeray : शिवसेना कुणाची? ठाकरे-शिंदे गटातील लढाई निर्णायक टप्प्यावर
abp majha web team
Updated at:
23 Nov 2022 09:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिवडणूक आयोगात कागदपत्रं जमा करण्याचा आज शेवटचा दिवस- ठाकरे आणि शिंदे गटाला निवडणूक आयोगात कागदपत्रं सादर करण्याची शेवटची मुदत आहे. या कागदपत्रांच्या आधारावर निवडणूक आयोग निर्णय देईल. निवडणूक आयोगामध्ये आज मुदतीच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गट साडेपाच लाख प्राथमिक सदस्यत्व अर्ज दाखल करणार आहेत. ठाकरे गटाकडून एकूण साडे पंधरा लाख प्राथमिक सदस्यत्व अर्ज आणि 2 लाख 82 हजार शपथपत्र दाखल केली जाण्याचा दावा करण्यात आला आहे.