Uddhav Thackeray Shiv Sena गटाने निवडणूक आयोगासमोर सादर केले दोन ट्रक पुरावे
Continues below advertisement
निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांकडून कागदपत्रांची लढाई सुरु झालेली आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडे दोन ट्रक भरुन शपथपत्र दाखल केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं केंद्रीय निवडणूक आयोगात ८ ते साडेआठ लाख शपथपत्र सादर केलेत. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्याने निडणूक आयोगाकडे कागदपत्रांची लढाई सुरु आहे. शिंदे गटानेदेखील अडीच लाख शपथपत्र दाखल केलेले असून साडेसात लाख शपथपत्र दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे.
Continues below advertisement