Maharashtra Politics : 23 जानेवारीला उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपणार

Continues below advertisement

बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाची... एकीकडे शिवसेना पक्षासाठी आणि चिन्हासाठी लढाई सुरू असताना ठाकरे गटासमोर आणखी एक पेच उभा राहिलाय.. निवडणूक आयोगाची लढाई सुरू असतानाच उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आली आहे... 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपणार आहे. अवघे बारा दिवस उरले असताना ठाकरे गटापुढे आणखी एक संकट उभे राहिले आहे.   तर दुसरीकडे  निवडणूक आयोगासमोर काल झालेल्या सुनावणीत शिंदे गटानं उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुखपद बेकायदेशीर असल्याचा दावा केला आणि यावरुन जोरदार घमासान झालं... आता याप्रकरणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे... कारण २०१८ साली झालेली शिवसेनेतील संघटनात्मक निवडीची निवडणूक ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसारच झाली आहे असा दावा आता ठाकरे गट करणार आहे... यासाठी निवडणूक आयोगानं त्यावेळी शिक्कामोर्तब केलेली कॉपी पुरावा म्हणून देणार आहे...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram