Uddhav Thackeray MNS - MVA Alliance : मनसे-मविआसाठी ठाकरे प्रयत्नशील?

Continues below advertisement

मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित मानली जात आहे... तर मनसेशी वैचारिक मतभेद असल्यानं मुंबई काँग्रेस यांनी ठाकरे बंधू सोबत न जाता  स्वबळावर मुंबईत निवडणूक लढवण्याचा निर्णय एक प्रकारे घेतल्याचा पहायला मिळत आहे... मात्र मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मिळून निवडणुकीच्या रिंगणात एकत्रित उतरला पाहिजे आणि त्यामध्ये राज ठाकरे हे सुद्धा सोबत असावे यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे..दरम्यान महायुती विरोधात मुंबई महापालिका निवडणूक जिंकायची असेल तर विरोधकांची वज्रमूठ आणखी घट्ट करून ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे हे प्रयत्नशील असताना पहायला मिळतायत.

     दरम्यान या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेनं चर्चांसाठी पुढाकार घेतल्याची माहिती समजतेय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची भेट घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजतेय. ठाकरेंच्या शिवसेनेकडून ज्या नेत्याला जागावाटपाच्या चर्चेची जबाबदारी देण्यात आलीय त्यांनी ही भेट घेतल्याची माहिती समजतेय. काँग्रेसला सोबत ठेवून महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर ठाम आहेत. त्यासाठी आपली फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल असा युक्तिवाद ते करतायत. इतकंच नाही तर भाजपला प्रत्युत्तर द्यायचं झाले तर विरोधकांची एकजूट राहणं फार महत्वाचं आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं काँग्रेसचे राज्यप्रभारी चेन्निथला यांनी मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड आणि मुंबईतल्या इतर नेत्यांसोबत बैठक घेऊन आपला निर्णय स्पष्ट कळवला तरी उद्धव ठाकरे दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी संपर्क साधणार असल्याची माहिती आहे... ठाकरेंच्या शिवसेनेत जागावाटपाची जबाबदारी दिलेल्या एका नेत्याला पुन्हा वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केलीय अशीही सूत्रांची माहिती आहे.

मुंबईतली मविआतली फाटाफूट टाळण्यासाठी पवारही अॅक्शन मोडवर?

मुंबई महापालिकेबाबत शरद पवारांचा काँग्रेस नेत्यांना फोन

बीएमसीत स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा निर्धार

दोनच दिवसांपूर्वी पवारांची मुंबई काँग्रेस नेत्यांनी घेतली होती भेट

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीबाबत काँग्रेस नेत्यांचा हिरवा कंदील

पवार काँग्रेसशी आघाडी करणार की मविआतली फाटाफूट टाळणार?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola