Uddhav Thackeray On Election Commission : आम्ही जय भवानी म्हणणारच, उद्धव ठाकरेंचा ठाम निर्धार

Continues below advertisement

   
ठाकरे गटाच्या निवडणूक गीतामध्ये जय भवानी शब्दावर निवडणूक आयोगानं आक्षेप घेत नोटीस पाठवली होती. ही नोटीस आज उद्धव ठाकरेंनी साफ धुडकावून लावली. पंतप्रधान मोदी जर प्रचारसभेत जय बजरंगबली म्हणू शकतात, मग आम्ही जय भवानी का म्हणून शकत नाही, असा सवाल ठाकरेंनी निवडणूक आयोगाला केला. भवानी माता ही संपूर्ण महाराष्ट्राची कुलदैवत आहे, आम्ही जय भवानी म्हणणारच, आणि तुम्हाला कारवाई करायची असेल तर आधी मोदी आणि शाहांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवा, असं आव्हान त्यांनी निवडणूक आयोगाला केलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram