Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शपथविधी, सासूबाई माधवी पाटणकर यांना काय वाटतं? | ABP Majha
महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून तर शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पद आणि गोपनियतेची आज शपथ घेतली. 'मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं म्हणत छत्रपती शिवराय आणि माता-पित्यांना वंदन करुन उद्धव ठाकरे यांनी शपथ सुरु केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वांना शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तमाम जनतेला वंदन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे , सुभाष देसाई, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
Tags :
Uddhav Thackeray Oath Ceremony Live Updates Maharashtra Government Formation Live Updates Mumbai Shivaji Park Latest News Shivaji Park Latest News Uddhav Thackeray Oath Ceremony Mother In Law Rashmi Thackeray Maharashtra Government Formation