Uddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, सिल्व्हर ओकवर झाली बैठक

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी आज शरद पवारांची भेट घेतली.. 'सिल्व्हर ओक'वर शरद पवार आणि ठाकरेंमध्ये बैठक पार पडली.. काल ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर आज पवार आणि ठाकरे यांच्यात भेट होत असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर आगामी निवडणुकीवर महाविकास आघाडीकडून लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या स्थापनेबाबतही चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.  ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर आगामी निवडणुकीवर महाविकास आघाडीकडून लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या स्थापनेबाबतही चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola