Maharashtra Politics | उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात रात्री उशिरापर्यंत खलबतं | ABP Majha
Continues below advertisement
शरद पवार दिल्लीहन मुंबईत दाखल होऊन तासही लोटत नाही तोच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत सिल्वर ओकमध्ये दाखल झाले. काल रात्री जवळपास सव्वा तास राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये महत्त्वाच्या विषयावर खलबतं सुरु होती. रात्री ११ वाजता सुरु झालेली चर्चा सव्वाबारा वाजती संपली...राष्ट्रवादीच्या वतीनं स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार तर शिवसेनेच्या वतीनं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हजर होते.
मुख्यमंत्रिपद, विधानसभाअध्यक्ष, खातेवाटप, एकसूत्री कार्यक्रम यासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर पवार आणि ठाकरेंमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचं कळतंय. बैठक संपल्यानंतर पवारांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना राऊतांनी सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत दिले . दरम्यान आज महाविकासआघाडीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता पवार आणि ठाकरेंच्या भेटीनंतर वर्तवली जातेय.

Tags :
Congress Shiv Sena President Rule Sonia Gandhi Uddhav Thackeray BJP Sharad Pawar Devendra Fadnavis Ncp Maharashtra