Uddhav Thackeray Kalyan Daura : उद्धव ठाकरे कल्याण दौऱ्यावर, शिवसैनिकांशी संवाद साधणार :ABP Majha

मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात आज ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे. शिंदेसोबतच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच कल्याण दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी अंबरनाथ, कल्याण आणि डोंबिवली भागात ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. उद्धव ठाकरेंचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे हे अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण,आणि डोंबिवलीसह कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील शाखांना भेट देऊन स्थानिक शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. हा दौरा पूर्ण दिवसभर असून, कल्याण मतदारसंघात आपल्या गटाची ताकद किती आहे याचा अंदाज उद्धव ठाकरे घेणार आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola