Uddhav Thackeray Group On Shinde Group : गोविंदाला पक्षात घेताना भाजपला नक्की विचारलंय ना?

Continues below advertisement

हिंदी चित्रपटसृष्टीतला नव्वद दशकामधला सर्वात लोकप्रिय अभिनेता गोविंदा आहुजानं राजकारणात पुनरागमन केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गोविंदानं शिवसेनेत प्रवेश केला. गोविंदाचा राजकारणातला हा दुसरा डाव असून, या डावात त्यानं चक्क यू टर्न घेतला आहे. गोविंदानं २००४ साली काँग्रेसमधून लोकसभेची निवडणूक लढवून भाजपच्या राम नाईक यांचा ४८ हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. तोच गोविंदा आता चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाला आहे. गोविंदाला मुंबईतल्या वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. पण गोविंदा हे आपल्यासमोर कोणतीही अट न ठेवता शिवसेनेत आले आहेत. तसंच आगामी निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक राहतील असं मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलं.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram