Uddhav Thackeray Full Speech : Thane : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray At Thane : "सध्याचं राजकारण गलिच्छ झालंय. महाराष्ट्रातील बंडाळीमुळे देशभरात बदनामी झाली. लांडगे विकले गेले, त्यांचा भाव काय होता हे सर्वांना माहिती आहे. निष्ठावंत निखारे शिवसेनेसोबत (Shiv Sena) आहेत. उद्या याच निखाऱ्यांच्या मशाली होतील" असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ठाण्यात (Thane) जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर केला. ठाकरे गटाचे खासदार राजन विचार यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांचा पहिलाच ठाणे दौरा होता. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.