Uddhav Thackeray FULL PC After SC Verdict : नैतिकता म्हणून राजीनामा दिला; उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

Continues below advertisement

Uddhav Thackeray FULL PC After SC Verdict : नैतिकता म्हणून राजीनामा दिला; उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली: राज्यपालांचे निर्णय चुकीचे आहेत, त्यांनी जे पाहिलंच नव्हतं त्या आधारे तत्कालीन राज्यपालांनी निर्णय दिला असल्याचे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने मारले आहे. महाविकास आघाडीचे सरकार पायउतार होताना राज्यपालांनी त्यांच्या विवेकाचा वापर हा घटनेनुसार केला नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं आहे. पक्षांतर्गत वादात राज्यपालांनी भूमिका बजावणं चुकीचं असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. 

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल सुनावला. शिंदे गटाने नियुक्त केलेला व्हिप बेकायदेशीर असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. तसेच 16 आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार हे विधानसभा अध्यक्षांनी घ्यावेत असेही निर्देश दिले आहेत. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की राज्यपालांकडे महाविकास आघाडीच्या सरकारच्या बहुमतावर शंका घेण्यासारखे कोणतीही वस्तुनिष्ठ परिस्थिती नव्हती. तरीही महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावलं.  

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, आमदारांना सरकारमधून बाहेर पडायचं होतं असं कुठेही दिसत नाही, त्यांनी फक्त गटबाजी केली. पक्षांतर्गत वाद सोडवण्यासाठी फ्लोअर टेस्ट घ्यायला सांगणं चुकीचं आहे, राज्यपालांनी तशी भूमिका घेणं चुकीचं होतं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram