Top 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07 June 2024 एबीपी माझा

Continues below advertisement

देवेंद्र फडणवीसांची राजीनाम्याच्या निर्णयावर  अमित शाहांची चर्चा, सध्याचं काम सुरु ठेवा, शपथविधीनंतर सविस्तर बैठक घेऊ, शाहांचा सल्ला, सूत्रांची माहिती

मी उपमुख्यमंत्री होणार या बातम्यांमध्ये तथ्य नाही, मंत्री गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण तर फडणवीसांनी सरकारमध्ये राहून पक्ष संघटनेचं काम करावं, महाजनांची मागणी

नरेंद्र मोदी ९ जूनला संध्याकाळी सहा वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार, भाजप नेते प्रल्हाद  जोशी यांची संसदीय पक्षाच्या बैठकीत घोषणा

नरेंद्र मोदींनी घेतली राष्ट्रपती मुर्मींची भेट, राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाला नितीशकुमार, चंद्राबाबू नायडूंसह एनडीए नेत्यांचं बहुमताने अनुमोदन, राज्यघटनेला वंदन करत पंतप्रधान मोदींचं इंडिया आघाडीला कृतीतून उत्तर.

एनडीए हा भारताचा आत्मा, पुढील १० वर्षे देशात एनडीए सरकार, पंतप्रधान मोदींचा विश्वास, तर ईव्हीएमवरुन विरोधकांनाही चिमटे, काँग्रेसला टोले

आम्ही संपूर्ण काळ मोदींसोबत राहणार, प्रत्येक निर्णयात मोदींची साथ देणार, पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाला अनुमोदन देताना नितीशकुमार यांचं आश्वासन

शिवसेना भाजप फेविकॉलचा जोड, तुटणार नाही, पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाला मुख्यमंत्री शिंदेंचं अनुमोदन, अजित पवार यांच्याकडूनही समर्थन

लोकसभा निकालांनंतर  शिंदेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता, शिंदेंच्या शिवसेनेतले ५ ते ६ आमदार ठाकरेंच्या संपर्कात, ठाकरे गटातल्या वरिष्ठ नेत्याची माहिती, शिंदे गटाच्या शिरसाटांचा पलटवार

कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार, फडणवीसांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंचा निर्णय, अशा गोष्टी वारंवार होणार नाहीत, मनसेचा इशारा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram