Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा 09 जून 2024 ABP Majha 10 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला दिमाखदार सोहळा
मोदी सरकारच्या ७२ मंत्र्यांचा शपथविधी, मोदींसह ३० कॅबिनेट मंत्री तर ४१ राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ
राजनाथ सिंग, अमित शाह, नितीन गडकरी, पियूष गोयल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, अनेक जुने सहकारी पुन्हा टीम मोदीमध्ये
महाराष्ट्राकडे ६ मंत्रिपदं, नितीन गडकरी, पियुष गोयल यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर प्रतापराव जाधव, रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
मोदींच्या मंत्रिमंडळात सहा महिलांना संधी, सीतारामन, शोभा करंदालजे, अन्नपूर्णा देवी, अनुप्रिया पटेल, रक्षा खडसेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ
मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आता खातेवाटपाकडे लक्ष, अर्थ, गृह, संरक्षण, परराष्ट्र ही महत्त्वाची खाती भाजप स्वत:कडे ठेवण्याची शक्यता...
एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा, चिराग पासवान यांनी चारच जागा जिंकूनही एक कॅबिनेट मंत्रिपद पटकावलं, शिवसेनेला मात्र एकच राज्यमंत्रिपद
((शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडली?))
राष्ट्रवादीविनाच आजचा शपथविधी, भाजपनं ऑफर केलेलं राज्यमंत्रिपद मान्य नाही, अजित पवारांचं विधान, तर विस्तारादरम्यान कॅबिनेट मंत्रिपद देणार, फडणवीसांची ग्वाही
मुंबईत मान्सूनची दमदार एन्ट्री..मुंबईत अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस, पावसामुळे गरमीने त्रस्त मुंबईकरांना दिलासा
अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्याचा मार्ग मोकळा, दोन एकर जागा देण्यास उत्तर प्रदेश सरकारची मंजुरी
((अयोध्येत महाराष्ट्र सदनाचा मार्ग मोकळा))
पाकच्या वेगवान आक्रमणासमोर भारतीय फलंदाज अपयशी, रिषभ पंतचा अपवाद वगळता अन्य बॅट्समन ढेपाळले, नसीम शाह, मोहम्मद आमीरचा प्रभावी मारा
---------------------------------
((भारतीय फलंदाज ढेपाळले))
जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार, बस दरीत कोसळली, १० जणांचा मृत्यू