Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 14 जून 2024 ABP Majha 11 PM
भाजपच्या मराठा आमदारांची बैठक,
१५ दिवसांत आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा, आमदारांची चंद्रकांत पाटलांकडे मागणी, केलेली काम मराठा समाजापर्यंत पोहचवण्याच्या सूचना
१ टक्का मतं वाढवली तरी विधानसभेला मोठा विजय, मंथन बैठकीत फडणवीसांच्या भाजप नेत्यांना सूचना, विरोधकांचे मुद्दे खोडून काढण्याचंही आवाहन
रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील, रावसाहेब दानवेंना अब्दुल सत्तारांचं प्रत्युत्तर, सिल्लोडचा पाकिस्तान होतोय, दानवेंनी केलं होतं वक्तव्य
अहंकारी लोकांना जनतेनं २४१ वर रोखलं, आरएसएसचे नेते इंद्रेश कुमारांच्या कानपिचक्या, तर आरएसएसनं भाजपचा अहंकार संपवावा, राऊतांचा टोला..
आषाढीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची वारकऱ्यांना भेट, दीड हजार दिंड्यांना मिळणार प्रत्येकी २० हजार रुपयांचा निधी, दौंडमधला प्रस्तावित कत्तलखाना रद्द करण्याचाही निर्णय
मराठवाड्यात पावसाचं धुमशान, संभाजीनगरच्या गेवराई कुबेर गावात ढगफुटीसदृश पाऊस, वाशिमच्या मंगळुरपीर तालुक्यातही जोरदार पाऊस
फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बखर सापडली...पुण्यातील संशोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांच्या हाती लागला ऐतिहासिक खजिना...
अयोध्येतील राम मंदिर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर, जैश ए मोहम्मदच्या धमकीनंतर मंदिराच्या सुरक्षेत वाढ
अमेरिेकेतल्या कॅलिफोर्नियात पीएनजी ज्वेलर्सवर दरोडा, २ मिनिटांत २० दरोडेखोरांनी अख्खं दुकान लुटलं, पाच जणांना बेड्या