Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha 31 July 2024
अकोल्यातील तोडफोड प्रकरणातील 3 आरोपी अटकेत, पंकज साबळे,सौरभ भगतपाठोपाठ दीपक बोडखेही ताब्यात, तर मुख्य सुत्रधार मनसेचे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे फरार.
अमोल मिटकरींच्या अकोल्यातल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला, जय मालोकार या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ.
मनसे सैनिकांनी राज ठाकरे यांच्या आदेशावरून हल्ला केला, हल्ल्यानंतर आमदार अमोल मिटकरींचा राज ठाकरेंवर आरोप.
लोकशाहीत मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, लोकप्रतिनिधींवर हल्ला ही घटना निषेधार्थ आहे, अमोल मिटकरींवर झालेल्या हल्ल्यावर रवी राणांची प्रतिक्रिया.
मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यूला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जबाबदार, जय मालोकार यांच्या नातेवाईकांचा गंभीर आरोप.
लायकी नसलेल्या अमोल मिटकरींना त्यांची लायकी दाखवली. मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांची प्रतिक्रिया. यानंतरही मिटकरींची बडबड थांबली नाही तर त्यांना महाराष्ट्रात कुठेही पाय ठेवू न देण्याचाही दिला इशारा.
उरणमधील यशश्री शिंदेंची हत्या करणारा आरोपी दाऊद शेखला ७ दिवसांची पोलीस कोठडी, काल रात्रीच पनवेल कोर्टात केलं हजर