Bhagat Singh koshyari | रखडलेल्या बारा आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लागणार?
12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीच्या यादीबाबात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील काही महत्वाचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. ठाकरे सरकारनं आमदारांच्या नियुक्तीसाठी यादी राज्यपालांकडे पाठवून 8 महिने उलटले तरी राज्यपालांनी त्यावर अजूनही निर्णय घेतलेला नाही.दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची आज संध्याकाळी 7: 30 वाजता भेट घेणार आहेत. त्यामुळे आज रखडलेल्या बारा आमदराच्या नियुक्तीची प्रश्न मार्गी लादणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.