Cm Eknath Shinde : One Nation One Election धोरणाचं अध्ययन करण्यासाठी नेमलेली ही चौथी समिती
Continues below advertisement
नवी दिल्लीतून मोठी बातमी आहे. एक देश, एक निवडणूक धोरणाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं समिती नेमली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीचे अध्यक्ष असतील. एक देश, एक निवडणूक धोरणाचं अध्ययन करण्यासाठी नेमलेली ही चौथी समिती आहे. महत्त्वाचं म्हणजे १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनात एक देश एक निवडणुकीसंदर्भातलं विधेयक मांडलं जाईल, अशी चर्चा कालपासून रंगतेय. त्या पार्श्वभूमीवर ही समिती नेमली जाणं महत्त्वाचं मानलं जातंय.
Continues below advertisement