BMC Election : प्रभागांच्या पुनर्रचनेचं काम तुर्तास जैसे थे! ,माजी नगरसेवकांची याचिका

Continues below advertisement

मुंबई महापालिकेतील एकूण प्रभाग संख्या आणि प्रभागांच्या पुनर्रचनेचं काम याबाबतची परिस्थितीत तूर्तास तरी जैसे थेच राहणार आहे. या प्रकरणी पाच जानेवारीच्या पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कार्यवाही न करण्याची हमी राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिली. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी पाच जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रभागांच्या संख्येवरून सत्ताधारी युती आणि मविआ यांच्यात संघर्ष सुरु आहे. मुंबई महापालिकेतल्या प्रभागांची संख्या नऊनं वाढवून, ती २३६वर नेण्याचा निर्णय मविआ सरकारनं घेतला होता. शिंदे-फडणवीस सरकारनं ऑगस्ट महिन्यात ती पुन्हा २२७वर आणण्याचा निर्णय घेतला. तसंच त्या २२७ वॉर्डसची पुनर्रचना करण्याचा निर्णय विद्यमान सरकारनं घेतला आहे. राज्य सरकारच्या त्या निर्णयाला ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.माजी नगरसेवक राजू पेडणेकरांची ही याचिका गुणवत्तेच्या आधारावर ऐकण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram