Uddhav Thackeray On Government : राज्य सरकार तातडीने बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी
राज्य सरकार तातडीने बरखास्त करून इथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय. राज्यात तातडीने निवडणुका घेण्याची मागणी ठाकरेंनी केली. राष्ट्रपतींवर विश्वास उरला नसल्यामुळे त्यांच्याकडे जाणार नसल्याची टीका त्यांनी केलीय. राज्याला मनोरूग्ण गृहमंत्री लाभलाय की काय असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.