Mangal Prabhat Lodha : मविआच्या मालाडमधील उद्यानाला देण्यात आलेलं टिपू सुलतानचं नाव बदललं :लोढा
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मालाडमधील एका उद्यानाला देण्यात आलेलं टिपू सुलतानचं नाव बदलण्यात आलंय. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबत ट्वीट करून ही घोषणा केली आहे. गेल्या वर्षी उद्यानाला टिपू सुलतानाचं नाव दिल्यामुळं महाविकास आघाडी आणि भाजपात मोठा वाद रंगला होता. आता या उद्यानाला देण्यात आलेलं टिपू सुलतानाचं नाव बदलण्यात आलं आहे.