chandrakant Patil | नव्या सरकारकडून विधानसभेचे नियम धाब्यावर : चंद्रकांत पाटील | ABP Majha
चंद्रकांत पाटील म्हणाले, नवीन सरकारने शपथविधी घेतल्यापासून विधान मंडळाचे नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केली. शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्र्यांनी शपथ घेताना आपापल्या नेत्यांची नावे घेतली हे बेकायदेशीर आहे. शपथविधीचीही एक पद्धत असते. त्यानुसारच शपथ घ्यावी लागते. परंतु नव्या सरकारकडून ठरलेल्या पद्धतीनुसार शपथ घेण्यात आली नाही. जर राज्यपालांनी न्याय दिला नाही तर सुप्रीम कोर्टात हे प्रकरण जाईल असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. त्याचसोबत जर राज्यपालांनी ही याचिका स्वीकारली तर सरकारने या 2 दिवसांत घेतलेले निर्णय रद्द होतील असंही ते म्हणाले.