Narayan Rane PC | सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला सर्वतोपरी मदत : नारायण राणे | ABP Majha

भाजपच्या सत्तेसाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. लवकरच 145 आमदारांची जुळवाजुळव करुन सत्तास्थापनेसाठी भाजपला मदत करणे हे माझे कर्तव्य आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. विधानसभेच्या निकालानंतर सत्तापेच निर्माण झाला असताना नारायण राणे पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही. देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर राणे पत्रकारांशी बोलत होते. राज्यात सत्ता स्थापनेला विलंब होतो आहे, हे योग्य नाही. जनतेची ज्यांना काळजी आहे असं सांगत आहेत, यांच्यामुळेच राज्यात सत्तास्थापनेस विलंब होतो आहे. आम्ही राज्यपालाकडे जाऊ तेव्हा यादी घेऊन जाऊ. आज मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. मुख्यमंत्र्यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करु, असं सांगितल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola