TMC | ठाणे महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्हस्के विराजमान होणार | ABP Majha
Continues below advertisement
ठाणे महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्हस्के तर उपमहापौरपदासाठी पल्लवी कदम यांची बिनविरोध निवड जळपास निश्चित झालीय. ठाणे महापौर पदाकरता अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. महापौरपदासाठी नरेश म्हस्के तर पल्लवी कदम यांचे एकमेव अर्ज आले आहेत.त्यानुसार आता म्हस्के यांच्या निवडीची केवळ औपचारीकताच शिल्लक राहिली आहे. ठाणे महापालकेच्या महापौर पदासाठी खुल्या वर्गाचे आरक्षण पडल्यानंतर अनेक जण महापौर पदासाठी उत्सुक होते. यामध्ये सुरु वातीपासूनच नरेश म्हस्के यांचे नाव आघाडीवर होते.
Continues below advertisement