MNS Shivaji Park Deepotsav : दीपोत्सवानिमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, राजकीय समीकरणं बदलणार?
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दीपोत्सवाचं उद्घाटन शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते होणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 'मावशीनं जेवायला बोलवलेलं होतं, ही कौटुंबिक स्नेहपूर्वक भेट होती,' असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी पूर्वीच्या भेटीवर दिलं होत. आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी शिवतीर्थावर (Shivtirth) होणाऱ्या या दीपोत्सवामुळे ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brothers) युतीच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. जुलै २०२५ पासून ठाकरे बंधू अनेक कौटुंबिक कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र येत असून, ज्यामुळे त्यांच्या राजकीय मनोमिलनाचे संकेत मिळत आहेत. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते नवे बदल घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement