Shiv Sena Whip: शिवसेनेच्या व्हिपवरुन राडा होण्याची शक्यता; व्हिप मिळाला तरी पाळणार नाही : ठाकरे गट

शिवसेनेच्या व्हिपवरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी काल आमदारांना व्हिप जारी केला होता आणि व्हिप न पाळल्यास दोन आठवड्यात कारवाई करु, असा इशाराही दिला होता. मात्र शिवसेनेचा व्हिप मिळाला नाही आणि मिळाला तरी पाळणार नाही, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. तिकडे आयोगानं शिंदे गटाला दिलेल्या चिन्ह आणि नावाच्या लढाईत व्हिप जारी न करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत.. शिवाय ठाकरे गटाच्या कुठल्याही आमदारावर कारवाई न करण्याचं आश्वासन शिवसेनेच्या वकिलांनी कोर्टात दिलं.. त्यामुळे आता शिवसेनेच्या व्हिपला ठाकरे गटानं पाठ दाखवली.. त्यानंतर शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola