Thackeray Group : मुंबईत उद्या होणाऱ्या ठाकरे गटाच्या मोर्चाला अद्याप परवानगी नाही : ABP Majha
मुंबईतील धारावी पुनर्विकासासंदर्भात उद्या होणाऱ्या ठाकरे गटाच्या मोर्चाला अजूनही मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. परवानगीबाबत निर्णय देण्याआधी मुंबई पोलीस ठाकरे गटाच्या महत्वाच्या नेत्यांसोबत आज दुपारी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतरच परवनगीचा निर्णय घेण्यात येईल.