Maharashtra politics Crisis : शिंदेंनी आयोगाकडे केलेल्या दाव्यांची कागदपत्रं देण्याची ठाकरे गटाची मागणी
Continues below advertisement
Maharashtra politics Crisis : सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाला दिलासा मिळाल्यानंतर हा सत्तासंघर्ष आता निवडणूक आयोगासमोर पोहोचला आहे. शिवसेना आणि पक्ष चिन्हावर दावा करणाऱ्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून आता आयोगासमोर डावपेच लढवले जाणार आहेत. शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे केलेल्या दाव्यांची प्रत आणि कागदपत्रं आपल्याला मिळावीत अशी मागणी ठाकरे गटानं आयोगाकडे केली आहे. शिंदे गटाच्या दाव्यांची तपासणी करून त्यानंतरच कागदपत्रं सादर करण्याची रणनीती ठाकरे गटानं निश्चित केलीय. सुनावणीदरम्यान दोन्ही गटांनी लाखो शपथपत्रं दाखल केलीत. त्यामुळे निवडणूक आयोगासमोर ओळख परेड होणार का याचीही उत्सुकता आहे.
Continues below advertisement
Tags :
ABP Majha LIVE Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra Politics ABP Maza Live Marathi News 'Eknath Shinde