Thackeray पिता-पुत्र MCA च्या निवडणुकीच्या मतदानाला येणार?, ठाकरेंची प्रचाराकडे पाठ : ABP Majha
Continues below advertisement
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेते पवार-शेलार पॅनलमध्ये एकत्र आले असताना या निवडणुकीच्या रणधुमाळीपासून ठाकरे पिता-पुत्र मात्र दूर राहिल्याचं चित्र आहे. उद्धव, आदित्य आणि तेजस ठाकरे या निवडणुकीच्या प्रचारात कुठेही दिसले नाहीत. त्यांचे समर्थक पवार-शेलार गटाकडून रिंगणात असले तरी त्यांच्या प्रचारापासून ठाकरे पितापुत्र दूरच असल्याचं दिसलं. विशेष म्हणजे काल शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या निवडणुकीसाठी एकाच व्यासपीठावर आले. पण या सगळ्या घडामोडींपासून ठाकरे मात्र दूर असल्याचं दिसलं.
Continues below advertisement