Raj Uddhav Morcha : राज ठाकरेंसोबतच्या चर्चेची इनसाईड स्टोरी
राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन करून संयुक्त मोर्चा काढण्याची इच्छा व्यक्त केली. मराठी माणसांचे दोन वेगळे मोर्चे निघणे योग्य नसल्याचे राज यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंनीही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला. मोर्च्यात कोणताही झेंडा नसेल, फक्त अजेंडा असेल असे राऊतांनी स्पष्ट केले. मोर्च्याची तारीख आणि ठिकाण दोन्ही पक्ष मिळून ठरवणार आहेत.